Bigg Boss Marathi New Episode Update: आयुष्यभर बाहेर ओव्हर ऍक्टिंग केली आता घरात करतायत, तुम्हाला पुरस्कार दिला याचा शासनाला पश्चाताप होत असेल अशा जहरी विधानांमधून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाकारांचा अपमान करणारी जान्हवी किल्लेकर सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. बिग बॉस शो च्या चाहत्यांनीच नव्हे तर सध्या अनेक सेलिब्रिटीज व काही राजकीय प्रतिनिधींनी सुद्धा आता जान्हवीच्या उर्मटपणावर कडवी टीका केली आहे.