Bigg Boss Marathi Today’s Episode Latest: आतापर्यंत बिग बॉसच्या भागात निक्की आणि अरबाज यांची भांडणं, प्रेम, मैत्री दिसून आली. त्याउलट वर्षा उसगांवकर आणि निक्कीची फक्त भांडणंच आपण पाहिली. मात्र आजच्या भागात बिग बॉसच्या घरातील २४ व्या दिवशी सगळं गणित वेगळंच झालेलं दिसून येणार आहे. आज वर्षा आणि निक्की या चक्क अरबाज व टीम ए च्या प्रॉब्लेम्सवर चर्चा करताना दिसतायत. आजच्या भागाची छोटीशी झलक इथे पाहा.