Bigg Boss Marathi Todays Episode: बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्यात सगळी समीकरणं बदलून गेली आहेत. बिग बॉसच्या घरातील टीम A आता निक्कीशिवाय खेळणार असून त्यात आर्याच्या वापसीचा मार्ग खुला झालाय असं दिसून येतंय. दुसरीकडे भाऊंच्या धक्क्यावर भांडलेले पॅडी व घनश्याम सुद्धा आता एकत्र आल्याचे दिसतायत. वॉशरूममध्ये दोघांमध्ये निक्कीच्या बदलत्या खेळाबाबत चर्चा झाली यावेळी घनश्यामने सुद्धा निक्कीने अति केल्याचं म्हणत आता आम्ही एकटेच लढणार असा इशारा दिला आहे. आजच्या भागाची एक छोटीशी झलक इथे पाहा