Bigg Boss Marathi Todays Episode: बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्यात सगळी समीकरणं बदलून गेली आहेत. मागच्या आठवड्यापर्यंत कचाकचा भांडणारी जान्हवी रडवेली झाली असून आता चक्क निक्कीच्या विरुद्ध आर्याशी चर्चा करताना दिसून आली. बिग बॉसच्या घरातील टीम A आता निक्कीशिवाय खेळणार असून त्यात आर्याच्या वापसीचा मार्ग खुला झालाय असं दिसून येतंय. स्विमिंगपूलच्या जवळ आर्या व जान्हवीमध्ये झालेल्या चर्चेची एक झलक इथे पाहूया.