Bigg Boss Marathi New Episode Today: बिग बॉसच्या घरात पाचव्या आठवड्यात मानकाप्याचा थरार पाहायला मिळत आहे. या भीतीने बिग बॉसने घरात काही जोड्या तयार केल्या आहेत. यामध्ये जान्हवी किल्लेकरची जोडी सुरज चव्हाणसोबत तर अंकिता वालावलकर व वर्षा उसगांवकर यांची जोडी तयार करण्यात आली आहे. या जोड्यांमध्ये वावरत असताना झालेली धम्माल आजच्या भागात आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आजच्या भागाची छोटीशी झलक पाहूया.