Bigg Boss Marathi New Episode Today: बिग बॉसच्या घरात पाचव्या आठवड्यात मानकाप्याचा थरार पाहायला मिळत आहे. या भीतीने बिग बॉसने घरात काही जोड्या तयार केल्या आहेत. यामध्ये अरबाज आणि आर्या व निक्की- अभिजितची जोडी करण्यात आली होती. दोन्ही जोड्या एकमेकांना चिडवण्यासाठी काही ना काही खुरापती करताना दिसतायत पण त्यात शेवटी अरबाजचा पारा फारच चढतो, यावेळी धनंजय (डीपी) दादा त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात पण मग पुढे काय होणार हे सांगणाऱ्या आजच्या भागाची छोटीशी झलक पाहूया.