Bigg Boss Marathi Season 5: ‘बिग बॉस मराठी-5’ या कार्यक्रमाच्या आठव्या आठवड्यात अरबाज पटेलने (Arbaz Patel) बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. ‘बिग बॉस-5’ मध्ये अरबाज आणि निक्कीची जोडी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत होती. अशातच अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर निक्की भावूक झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आता अरबाजनं अनेक खुलासे केले आहेत. “निक्की शोमध्ये नसती तर तू काय केलं असतंस?”, या प्रश्नाचं उत्तर देखील आता अरबाजनं (Arbaz Patel Interview) दिलं आहे.