Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli : ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये ‘फॅमिली वीक स्पेशल’ टास्क चालू आहे. या आठवड्यात सर्व स्पर्धकांच्या घरातील सदस्य त्यांना भेटायला बिग बॉसच्या घरात येत आहेत. आजच्या एपिसोडमध्ये निक्कीच्या आईची घरात एंट्री होणार आहे. निक्की तांबोळी व तिच्या आईच्या भेटीचा प्रोमो कलर्सने शेअर केला आहे. यात निक्की तिचं आणि अरबाजचं नातं संपलं असं म्हणताना दिसत आहे.निक्कीची आई प्रमिला तांबोळी म्हणाल्या की अरबाजचा साखरपुडा झाला आहे, जे त्याने केलं ते बरोबर नाही. यानंतर निक्की भडकते, अरबाज निक्कीचं जे होतं ते संपलं. ती त्याचे कपडे गोळा करते एका पिशवीत ठेवते आणि बिग बॉसला म्हणते की हे अरबाजचे कपडे आहेत, ते फेकून द्या. यानंतर खरंच अरबाजचा साखरपुडा झाला आहे का, अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. यावर आता अरबाजने प्रतिक्रिया दिली आहे.