Nikki Tamboli- Arbaz Patel Bigg Boss Marathi 5: निक्की तांबोळीचे आई-बाबा या आठवड्यात बिग बॉसच्या घरात तिला भेटायला आले. यावेळी त्यांनी अभिजीतचं कौतुक केलं. निक्कीने केलेल्या अपमानाबद्दल तिची आई प्रमिला तांबोळी यांनी वर्षा उसगांवकर यांची माफी मागितली. घरातील सदस्यांशी गप्पा मारताना अरबाजचा विषय निघाला, त्यावर निक्कीच्या आईने अरबाजच्या आई-वडिलांना त्रास होतोय असं सांगितलं. निक्कीच्या आईने सांगितलेल्या या प्रतिक्रियेनंतर निक्की चांगलीच हादरली होती, मला तर डिप्रेशन आलंय असंही निक्की म्हणाली. नेमकं असं प्रमिला तांबोळी यांनी बिग बॉसच्या घरात काय सांगितलं हे आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहूया. पाहा बिग बॉसच्या नव्या भागाची एक झलक