आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम अशा दमदार कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘मानवत मर्डर्स’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मानवत हत्याकांड घडलं तो काळ १९७० ते १९७५ या कालावधीतला होता. संपूर्ण महाराष्ट्र या बातमीने हादरला होता. याच सत्य घटनेवर आधारित मानवत मर्डर्स ही सीरिज ४ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आली. याविषयीच गप्पा मारण्यासाठी लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजीटल अड्डाला संपूर्ण स्टारकास्टने उपस्थिती लावली होती