परेश मोकाशी दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ चित्रपट १ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. अभिनेते प्रशांत दामले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गितांजली कुलकर्णी, अद्वैत दादरकर, राजेश मापुस्कर, दीप्ती लेले, मनमीत पेम, प्रणव रावराणे अशी तगड्या कलाकारांची फौज झळकणार आहे. नवीन वर्षांची सुरुवातच हास्याने होणार आहे. त्यानिमित्ताने ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ चित्रपटातील कलाकारांशी खास संवाद.