संगीत मानापमान या जुन्या संगीत नाटकावरून प्रेरित असेला सिनेमा ‘संगीत मानापमान’ १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने सिनेमाचे दिग्दर्शक, अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री वैदेही परशुरामी, गायिका बेला शेंडे आणि जिओ स्टुडिओजचे मराठी विभागाचे प्रमुख निखिल साने यांनी ‘लोकसत्ता’च्या डिजिटल अड्ड्याला भेट दिली होती. यावेळी चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी केलेली धमाल, पात्रांची निवड आणि सांगीतिक सिनेमाचं आव्हान याविषयी सिनेमाच्या टीमने साधलेला हा मनमोकळा संवाद.