हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने या कलाकारांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावली होती. चित्रपटाचं कथानक, कलाकारांचं कास्टिंग, मराठी सिनेविश्वाची सद्यस्थिती अशा बऱ्याच विषयांवर या कलाकारांनी दिलखुलासपणे संवाद साधला.