‘बार बार देखो’ या चित्रपटाच्या माध्यमातून नित्या मेहेरा हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. रोमॅंटिक ड्रामा असणाऱ्या या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून या बहुप्रतिक्षित चित्रपट एक वेगळेच कथानक हाताळताना दिसणार आहे. कतरिना आणि सिद्धार्थची ‘सिझलिंग केमिस्ट्री’ असणारा ‘बार बार देखो’ हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे