पुण्याचं ग्रामदैवत म्हणजे कसबा गणपती. या गणपतीला १४०० वर्षांचा इतिहास आहे. ही मूर्ती तांदळा स्वरुपात आहे. या मूर्तीवर शेंदूर लेपन करण्यात येतं. पुण्यातला पहिला मानाचा गणपती असा बहुमान या गणपतीला लाभला आहे. पुण्यातले मानाचे पाच गणपती, मनातले गणपती आणि इतर गणपती आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत लोकसत्ताच्या तू सुखकर्ता! या विशेष कार्यक्रमात. आज पाहुयात कसबा गणपतीबाबतचा हा खास वृत्तांत