पुण्यातला मानाचा पहिला कसबा गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लाल महाल चौकातून पालखीतून बाप्पाची मूर्ती उत्सव मंडपात आणण्यात आली. त्यानंतर मोजके कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणेशाला फेटा आणि अलंकार परिधान करण्यात आले.