यंदा करोनामुळं कलाकार म्हणून विविध सांस्कृतीक महोत्सव मिस करणार आहे. देवाच्या रुपानं कोविड योद्धे आपल्यासोबत पावला पावलावर उभे होते. समाजासाठी ते अद्यापही रस्त्यावर येऊन लढत आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात अनेक मंडळांनी स्तुत्य उपक्रम राबवले. कोविड योद्ध्यांना आर्थिक मदत, रक्तदान, प्लाझ्मा यासाठी तुम्ही या मंडळांना भेट देऊ शकता. त्यासाठी शक्य तितकं दान त्यांना देऊ शकता. खऱ्या अर्थानं भक्ती आणि श्रद्धा दाखवण्याची ही वेळ आहे.