पुणे शहरात वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. नागरिकांनी विसर्जनासाठी घराबाहेर पडू नये आणि संसर्ग वाढू नये नदीपात्रात किंवा त्या परिसरातील विसर्जन हौदामध्ये विसर्जनाला यंदा बंदी आहे. त्यामुळे महापालिकेकडून फिरते विसर्जन हौद तयार करण्यात आले आहेत. या हौदात किंवा घरीच बाप्पाचे विसर्जन करावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.