पुण्यातील अखिल मंडईचा गणपती हा व्यापाऱ्यांचा गणपती बाप्पा म्हणून ओळखला जातो. तीन वर्षांतून एकदा ही मूर्ती झोपाळ्यावर विराजमान होते. उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती आहे. १९५३ साली मंडईतल्या व्यापाऱ्यांनी गजानान शारदेची प्रतिकृती मंडळाला भेट दिली. शारदेसह विराजमान असणारी ही भारतातील एकमेव गणेशमूर्ती आहे. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण अखिल मंडईच्या गणपतीबद्दल जाणून घेणार आहोत.