गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. सुरुवातीला हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. पण कालांतराने मंडपात गणेशोत्सव साजरा होऊ लागला. या गणेशोत्सवाला १८८७ मधेच सुरुवात झाली. विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण गुरुजी तालीम मंडळ गणपतीबद्दल जाणून घेणार आहोत.