श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या बाप्पाची ही मूर्ती अतिशय वेगळी असून लाकूड आणि भुसा वापरून तयार केली गेली आहे. १२९ वर्षांपासून मंडळ इको फ्रेंडली गणपतीची स्थापन करत आहे. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीबद्दल जाणून घेणार आहोत.