कोकणी माणूस आणि गणेशोत्सवाचं नातं हे फार जुनं राहिलं आहे. कितीही मोठं संकट असो किंवा कितीही महत्वाचं काम…कोकणी माणूस गणपतीला गावात जातोच जातो. यंदा करोनामुळे कोकणातल्या गणेशोत्सवावर फरक पडला असला तरीही पूर्वीपासून सुरु असलेली भजनाची परंपरा कायम आहे. गावातील गणपती बसलेल्या घरांमध्ये जुनी जाणती मंडळी नवीन मुलांना घेऊन भजनाचा कार्यक्रम आखतात, आणि मग सुरु होते कोणताही भपका नसलेली निर्मळ गणेशभक्ती. पाहूयात गणेशोत्सवाचे कोकणी रंग…