पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिरसंपूर्णपणे काळ्या पाषाणात केलेले मंदिर पेशवाईतील शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या रचनेवर राजस्थानी, माळवा तसेच दाक्षिणात्य स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात तीन सोंडा असलेली मोरावर बसलेली गणपतीची मूर्ती आहे. मंदिराला एक प्रशस्त तळघर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे मंदिर पाहायला मिळत नाही. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण त्रिशुंड गणपती मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत.