केसरी वाडा गणपती पुण्यातला मानाचा पाचवा गणपती आहे. लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ या संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. १९०५ पासून टिळक वाड्यात गणेशोत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव यांचा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण केसरी वाडा गणपतीचा हा इतिहास तसंच महत्त्व जाणून घेणार आहोत.