पुण्यातील नवी पेठ हत्ती गणपती मंडळाला १२९ वर्षांचा इतिहास आहे. १८९३ मध्ये देवकर, पानसरे, पडवळ आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी नवी पेठ हत्ती गणपती मंडळाची स्थापना केली. स्थापनेपासून ही श्रींची तिसरी मूर्ती आहे. या मूर्तीला ५५ वर्ष पूर्ण झाली आहेत. वाघावर हत्ती आणि त्यावर गणपती बाप्पा विराजमान असणारी महाराष्ट्रातील अशी ही एकमेव मूर्ती आहे. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण ‘नवी पेठ हत्ती गणपती’बद्दल जाणून घेणार आहोत.