पहिल्याच दिवसापासून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायाल मिळाली. पहिल्याच दिवशी भाविकांनी बाप्पाला भरभरून दान केलं आहे. त्याचीच आता मोजदाद सुरू झाली आहे. यामध्ये भारतीय आणि विदेशी चलनांचा देखील समावेश आहे. शिवाय चांदीची मूर्ती, गदा, सोन्याचे अलंकार अशा वस्तूंचाही समावेश आहे.