भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या दुसऱया कसोटीत भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या अखेरीस ४ बाद ३१७ धावा केल्या. विराटने कर्णधारी खेळी करून नाबाद १५१ धावा केल्या, तर पुजाराने आपला दमदार फॉर्म कायम राखत शतकी खेळी साकारली. विराट आणि पुजाराच्या २२६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाला दिवसाच्या अखेरीस ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला.