करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा अनिश्चीत काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत. खेळाडूही आपल्या चाहत्यांना घरी राहून स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. नेहमी आपल्या परिवारापासून दूर मैदानावर खेळत असलेले खेळाडू या निमीत्ताने आपल्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत.