भारत आणि इंग्लंडविरुद्धचा चौथा सामना निकालापेक्षा या सामन्यातील वादग्रस्त निर्णयांमुळेच गाजला. तिसरे पंच विरेंद्र शर्मा यांनी दिलेले काही निर्णयांवरुन भारतीय चाहत्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. चांगली फलंदाजी करत असणाऱ्या सूर्यकुमारचा झेल हा सॉफ्ट सिग्नलच्या आधारावर तसेच कनक्युजीव्ह एव्हिडन्सच्या आधारावर योग्य असल्याचा निर्णय दिल्याने शर्मा यांच्यावर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी चांगलीच टीकेची झोड उठवली केली. या निर्णयानंतर सॉफ्ट सिग्नल हा विषय ट्विटरच्या टॉप ट्रेण्डमध्ये आला. मात्र सॉफ्ट सिग्नल म्हणजे नेमकं काय हे अनेकांना ठाऊक नाहीय. त्यामुळेच या व्हिडीओमध्ये आपण या नियमासंदर्भात जाणून घेणार आहोत…