टी -२० विश्वचषकाला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. या विश्वचषकातील सर्वात मोठ्या सामन्यासाठी आता काउंटडाउन सुरू झाले आहे. २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे संघ सुमारे २८ महिन्यांनंतर एकमेकांसमोर असतील. त्यामुळे या सामन्यासाठी चाहते आतुर आहेत. दोन्ही संघ शेवटच्या वेळी २०१९ च्या विश्वचषकात भेटले होते. त्यामुळे या सामन्यावर संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्यातून ICC मोठ्या प्रमाणात कमाई करते. प्रायोजकांपासून टीव्ही जाहिरातींपर्यंत अनेकजण भरपूर पैसा कमावतात. पण भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना सामना खेळण्यासाठी किती पैसे मिळतात हे तुम्हाला ठाऊक आहे का?#T20WC2021 #T20Cricket #IndvsPak #icc