टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ३१ ऑक्टोबर रोजी होणारा भारत-न्यूझीलंड सामना महत्वाचा ठरणार आहे. या सामन्यात कोणताही संघ हरला तरी स्पर्धेतील त्या संघाचा प्रवास जवळपास संपुष्टात येणार आहे. कारण दोन्ही संघांना पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. भारताला पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला, तर न्यूझीलंडच्या संघालाही पाकिस्ताने पराभूत केले आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत न्यूझीलंडला पराभूत करावे लागेल. उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला काय करावे लागेल यावर एक नजर टाकूया.