अजित पवार यांनी सोमवारी सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सातारा, कोल्हापूर आणि पुण्यात पाऊस पडतोय. त्यामुळे काही ठिकाणच्या मतदान केंद्रावर अडचणी निर्माण झाल्या. मात्र, आता पावसासारखं मतदारांनी भरपूर मतदान करायला हवं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.