राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानास सुरूवात झाली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघातील दहीटने गावात मतदान प्रक्रियेदरम्यान हाणामारीची घटना घडल्याचे समोर आले आहे. करमाळ्यातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण करण्यात आली. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप नारायण पाटील यांनी केला आहे.