नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीला पुन्हा एकदा कौल दिला. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आठवडाभरात सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमक काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.