राज्यात निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना-भाजपात मुख्यमंत्रीपदासह सत्तावाटपावरून कलगीतुरा रंगला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचं झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सत्तेचं समसमान वाटप होईल असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं, असं सांगत शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावला आहे. तर अशी काही चर्चा झाली नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या त्या पत्रकार परिषदेचा व्हायरल व्हिडीओ.