भावनगर येथील स्वामीनारायण गुरुकुल प्रतिष्ठा महोत्सवाच्या कार्यक्रमात स्मृती इराणी यांचीही हजेरी होती. या कार्यक्रमात काही विद्यार्थिनींन तलवारबाजी करत प्रात्यक्षिकं दाखवली. या प्रात्यक्षिकांमध्ये स्मृती इराणी यांचाही सहभाग होता. स्मृती इराणी यांनीही तलवारबाजी करुन नारीशक्तीचे प्रदर्शन घडवले.