मी स्थानिक प्रशासनाची ऋणी आहे. माझ्या हाकेला प्रतिसाद देत ते आमच्या मदतीला धावून आले. अन्यथा आमच्यावर उपाशी मरण्याची वेळ येण्याची चिन्ह होती. असे पूजा सिंग यांनी सांगितले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून त्यांना अन्नधान्य मिळाले. हे सर्व सांगत असताना पूजा सिंग यांच्या डोळ्यात पाणी आले. सध्या करोना विषाणूमुळे अनेकांचे संसार उघडयावर आले असून दोन वेळ च जेवण मिळणं कठीण झालं आहे.