शभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहानास सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शहरी भागांप्रमाणे ग्रामीण भागातही हा नियम पाळला जात आहे. वर्धा जिल्ह्यातील प्रा. सोनुरकर यांच्या शेतात देखील सोशल डिस्टंसिंगचे भान राखत कामं केली जात आहेत.