केंद्र शासनानं लॉकडाउनमुळं देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना परवान्यासह प्रवासाची मुभा दिल्याने आज मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील अच्छाड येथे या वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी होत असल्याने वाहनांच्या रांगा दिसून आल्या.