कोणताही आडपडदा न ठेवता रोखठोक भूमिका मांडणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व. त्यांच्याशी गप्पा मारणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. त्याची झलक आज ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’ या नव्या उपक्रमात पाहावयास मिळाली. १५ मे रोजी सायंकाळी सात वाजता वेबसंवादाद्वारे हा गप्पांचा फड रंगला. गडकरींचे चौफेर अनुभव आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक अस्पर्शित पैलू जाणून घेण्याची संधी वाचकांना यानिमित्ताने मिळाली. सुसंवादक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्याशी गप्पा रंगवल्या.