पुणे: करोनाबाबत हटके स्वरुपात जनजागृती करताना एक पुणेकर नागरिक सध्या रस्त्यांवर पहायला मिळत आहे. राजेश मांढरे असे या पुणेकराचं नाव असून ते विश्रामबागवाडा मित्र मंडळाचे सदस्य आहेत. करोनापासून बचावासाठीचे संदेशचित्र त्यांनी आपल्या कुर्त्यावर रंगवून घेतले आहेत. त्याचबरोबर जनजागृतीसाठी शहरात बाईकवरुन फिरताना ते करोना विषाणूची प्रतिकृती असलेलं हेल्मेट परिधान करतात. ते त्यांनी घरच्याघरीच वर्तमानपत्र आणि पोस्टर कलर्सच्या माध्यमातून बनवलं आहे