इतिहासात आजवर कधीही बंद नसलेलं मुंबई शहर लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने बंद होतं. त्यानंतर आता ते हळूहळू पूर्वपदावर येत असून बेस्ट बसही सुरु झाल्या आहेत. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर या बसमध्ये पन्नास टक्केच प्रवाशांना प्रवास करण्याबाबत शासनानं बंधन घातल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे. बेस्ट बस सुटणाऱ्या ठिकाणाहूनच भरून येत असल्याने वाटेतील स्टॉपवर त्या थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बराच काळ तिष्ठत उभे राहावे लागत आहे. ठाणे येथील तीन हात नाका येथे अर्ध्या तासांपासून मुंबईला जाणारे हे सर्व प्रवासी बस थांबवण्याची वाट पाहत आहेत. सार्वजनिक वाहतुकीची अशी अवस्था असल्याने अनेकांनी आपल्या दुचाक्या रस्त्यावर आणल्याने रस्त्यांवर दुचाक्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मुलुंड (पूर्व) येथील टोल नाक्यावरही वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.