पिंपरी-चिंचवडमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्या अनेक नागरिकांनी, महानगर पालिका प्रशासन सुविधा पुरवत नसल्याचा आरोप करत आज गोंधळ घातला. यावेळी अनेक नागरिक क्वारंटाइन सेंटरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, गेटला कुलूप असल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही. तर, महानगर पालिकेच्या प्रशासनाने नागरिकांचा आरोप फेटाळू लावला आहे.