मंगळवारीच भारताचे २० जवान शहिद झाल्याची बातमी समोर आली. लडाख सीमेवरुन चीन भारताच्या कुरापती काढतो आहे. त्याआधी डोकलाममध्येही चीनने अशीच दादागिरी केली होती. आता लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. लडाख सीमेवर गोळीबार झाला, ज्यात एक अधिकारी आणि दोन जवान असे तीन जण शहीद झाल्याचं वृत्त आलं होतं या संदर्भात परराष्ट्र धोरण या विषयाचे गाढे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांच्या लोकसत्ता ऑनलाइनने डिजिटल अड्डावर चर्चा केली. पाहा ती संपूर्ण मुलाखत