“भारताच्या अरुणाचल प्रदेशमधील चीन सीमेजवळ सध्या सव्वा लाखांच्या जवळ जवान तैनात आहेत. तर सिक्कीमधील सीमेजवळही ६० हजारांवर सैनिक तैनात आहे. हिमाचलच्या भागातही ५० ते ६० हजार आणि लडाखच्या भागातही ३० ते ३५ हजार सैनिक आणि १२० ते १४० रणगाडेही आहेत. आपले शूर जवान त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. चीनला भारताची डिफेन्सिव्ह लाइन ओलांडणं अशक्य आहे,” असं मत ब्रि. (नि.) हेमंत महाजन यांनी व्यक्त केलं.
लोकसत्ताच्या डिजिटल अड्डा या विशेष कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारत चीन संबंधांवर आपलं मत व्यक्त केलं.