ज्या जमिनीत कुसळही उगवण्याची शक्यता मावळली होती, अशा जमिनीत हिरव्यागार करून तेथे उसाचा गोडवा निर्माण करण्याचे स्वप्न पाहणे हे धाडसीपणाचे लक्षण होते. पण त्याहून अधिक धैर्य होते ते क्षारपड जमिनीसाठी कर्जपुरवठा करण्याचे. असे धैर्य एका सहकारी बँकेने दाखवले; तेव्हा बँकेच्या व्यवस्थापनाला वित्तीय क्षेत्रातून चक्क वेड्यात काढले गेले. पण आता परिस्थिती ३६० अंशात बदलली आहे. क्षारपड जमीन सुधारणेसाठी कर्ज घेतलेल्या शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जाची फेड मुदतीपूर्वीच केली आहे.