पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. मे महिन्यात ११ तर २४ जून संपेपर्यंत ३५ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. लॉकडाउन सुरू झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तर पुन्हा काम सुरू झालं असलं तरी तेव्हाच्या वेतनात आणि आत्ता मिळत असलेल्या वेतनात मोठ्या प्रमाणावर फरक पडत आहे. याचा थेट परिणाम जीवनशैलीवर होत आहे. कुटुंबाच्या वाढलेल्या अपेक्षा, लॉकडाउनमुळे नोकरीवर झालेला परिणाम आणि कौटुंबिक वाद यातून येणाऱ्या तणावातून, नैराश्यातून अनेक जण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत, अस पोलिसांचं म्हणणं आहे.