मुंबई : मालाड पूर्वमधील अप्पापाडा येथील झोपडपट्टीत करोनाची लक्षण आढळलेल्या लोकांची आरोग्य स्वयंसेवकांनी शुक्रवारी स्क्रिनिंग केली. या स्वयंसेवकांमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. या महिलांनी लोकांच्या स्क्रिनिंगपूर्व पीपीई किट घालून रुग्णांच्या शरिराचे तापमान तपासले. झोपडपट्टीतील गल्लीबोळांमध्ये जाऊन त्यांनी इथल्या नागरिकांमध्ये करोनाबाबत जनजागृतीही केली.