राज्य सरकारने सलून आणि ब्युटीपार्लर व्यवसायाला आजपासून परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक सलूनच्या बाहेर सॅनिटायझर, ग्राहकांना मास्क, कामगारांना फेसशिल्ड आणि हँड ग्लोव्ह्ज तसेच ग्राहक येण्यापूर्वी खूर्ची सॅनिटाइझ करण्यात येत आहे. अशा प्रकारे सर्व सुरक्षा साधनांसह तसेच नियम-अटींनुसार आजपासून या व्यवसायाला सुरुवात झाली.