पूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर सीमेवर तणाव असून, देशातून चीनला उत्तर देण्याचा सूर उमटत आहे. केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.